Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»बाळांनो… सावध व्हा!
    लोकशाही विशेष

    बाळांनो… सावध व्हा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 10, 2026No Comments251 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मन की बात

    पावसाळा आला की निसर्ग खुलतो. हिरवागार परिसर, धबधबे, ओढे, नद्या, तलाव आणि खदाणीतील पाणी पाहून प्रत्येकालाच त्या सौंदर्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह होतो पण आजकाल आठवणी जपण्यासाठी काढला जाणारा फोटो अनेकदा आयुष्याची शेवटची आठवण ठरत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे धोका माहिती असूनही तरुणाई त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

    अमळनेर येथे घडलेली घटना ही केवळ तीन मुलांच्या मृत्यूची बातमी नाही; ती संपूर्ण समाजाला हादरवणारी आणि प्रत्येक पालक, विद्यार्थी व युवकांसाठी गंभीर इशारा आहे. काही क्षणांच्या सेल्फीच्या मोहापायी तीन निष्पाप मित्रांनी आपले संपूर्ण आयुष्य गमावले. एका मित्राचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याने हात पुढे केला, तिसऱ्याने दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला; पण नियतीने तिघांनाही कायमचे हिरावून घेतले. मैत्रीचे हे उदाहरण जरी हृदयस्पर्शी असले, तरी अशा परिस्थितीला सामोरे जावेच लागू नये, हीच खरी गरज आहे. आज सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याची स्पर्धा सुरू आहे. ‌‘किती भन्नाट फोटो‌’, ‘किती जबरदस्त रील‌’, ‘किती धाडसी स्टंट‌’ अशा प्रतिक्रियांसाठी अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालतात. लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या आकड्यांनी जणू विवेकावर पडदा टाकला आहे. जिथे ‌‘धोकादायक‌’ असा फलक असतो, तिथेच फोटो काढण्यात काहींना वेगळाच आनंद वाटतो. रेल्वे रुळ, धबधब्याचा कडा, भरलेली नदी, उंच इमारतींचे टोक किंवा खोल खदाणी… या ठिकाणी घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर काही तास झळकतो; पण त्यानंतर मागे राहते ती कायमची वेदना.

    पावसाळ्यात धोका अनेकपटीने वाढतो. पाण्याची खोली दिसत नाही, चिखलामुळे पाय घसरतो, प्रवाहाचा अंदाज येत नाही आणि काही क्षणांत परिस्थिती हाताबाहेर जाते. पोहता येत असले तरी खोल पाणी, गाळ आणि भोवरे यांच्यासमोर अनेकदा अनुभवही निष्प्रभ ठरतो. त्यामुळे ‌‘मला काही होणार नाही‌’ हा आत्मविश्वास नव्हे, तर अति आत्मविश्वास असतो. या घटनेत आणखी एक पैलू विचार करायला लावतो. एका मित्राला वाचवण्यासाठी इतर दोघेही पाण्यात उतरले. संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे ही माणुसकी आहे; परंतु स्वतःला पोहता येते का, परिस्थिती हाताळण्याची क्षमता आहे का, याचाही विचार आवश्यक आहे. अन्यथा एकाला वाचवताना अनेकांचे जीव धोक्यात येतात. अशा वेळी तातडीने स्थानिकांची मदत घेणे, दोरी, काठी किंवा इतर सुरक्षित साधनांचा वापर करणे अधिक योग्य ठरते. या दुर्घटनेत जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन तिन्ही मुलांना बाहेर काढणाऱ्या दीपक मोरे यांचे धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे. पण त्यांच्या प्रयत्नांनाही वेळेवर यश मिळू शकले नाही. हीच वस्तुस्थिती सांगते की, अपघात घडल्यानंतरचा बचाव नेहमीच यशस्वी होईल असे नसते. म्हणूनच प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.

    पालकांनीही मुलांशी संवाद वाढवण्याची गरज आहे. ‌‘तिकडे जाऊ नकोस‌’ एवढे सांगून जबाबदारी संपत नाही. धोकादायक ठिकाणे कोणती, पावसाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, संकटात कसे वागावे याबाबत घरात नियमित चर्चा व्हायला हवी. शाळा आणि महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांसाठी जलसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि सोशल मीडिया वापराबाबत जनजागृती करणे काळाची गरज बनली आहे. प्रशासनाचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. धोकादायक खदाणी, तलाव आणि नदीकाठच्या परिसरात मजबूत संरक्षक कुंपण, स्पष्ट इशारा फलक, सीसीटीव्ही, आवश्यक ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि नियमित गस्त यांची व्यवस्था झाली तर अशा घटनांमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र, कोणतीही व्यवस्था नागरिकांच्या सजगतेची जागा घेऊ शकत नाही. एक सेल्फी पुन्हा काढता येतो. एक रील पुन्हा बनवता येते. सोशल मीडियावरील पोस्ट पुन्हा करता येते. पण गेलेला जीव कधीच परत येत नाही. काही सेकंदांच्या आकर्षणासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणे हा व्यवहार कधीच शहाणपणाचा ठरू शकत नाही. आज प्रत्येक तरुणाने स्वतःला एकच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारे काही क्षण महत्त्वाचे की आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील आयुष्यभराचे स्वप्न? उत्तर जर आयुष्य असेल, तर धोकादायक ठिकाणचा प्रत्येक सेल्फी नाकारण्याचे धैर्यही दाखवावे लागेल. शेवटी बाळांनो… सावध व्हा एवढेच!


    दीपक कुलकर्णी
    वरिष्ठ उपसंपादक
    मो. 9960210311

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?

    September 7, 2026

    अनिलभू… आता जोमाने कामाला लागा!

    September 3, 2026

    निष्पाप बळी : लोकप्रतिनिधी मूग गिळून का?

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif