१४ वर्षीय मुलीचा बालविवाह लावला ; ९ जणांवर गुन्हा दाखल

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

बालविवाह करणे कायद्याने बंदी असूनही बालविवाहाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. धरणगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आई-वडिलांसह नवरदेव मुलगा, सासू-सासरे अशा ९ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली असून संरक्षण अधिकारी चंद्रशेखर रविंद्र सपकाळे यांनी दिलेल्या रिपोर्टने गुन्हा दखल करण्यात आला आहे. दि. १० जानेवारी २०२२ रोजी फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही संबंधितांनी तिचा विवाह संमतीवीना राहुल राजु ढालवाले (रा. शेतपुरा चोपडा) याच्याशी मुलीचे नातेवाईक व मुलाचे नातेवाईक अशांनी संगनमताने लावून दिला.

राहुल राजू ढालवाले (नवरदेव), राजू रामदास ढालवाले (सासरा), जनाबाई राजू ढालवाले (सासू), सुनील राजू ढालवाले (जेठ), अर्जुन राजू ढालवाले (जेठ), (सर्व रा. शेतपुरा चोपडा ता. चोपडा) यांच्यासह मुलीचे आई, वडील, काका, काकू यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारी जबाबावरुन संरक्षण अधिकारी धरणगाव चंद्रशेखर रविंद्र सपकाळे यांनी दिलेले रिपोर्टने बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौ. योगेश जोशी हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.