Thursday, May 26, 2022

शॉक लागल्याने जळगावात बालकाचा मृत्यू

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरातील तांबापुर येथील जुने मेहरुन रोड हनुमान मंदिराजवळ शॉक लागल्याने चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. तुषार उर्फ आरु शिवाजी सुरवाडकर असे मयत बालकाचे नाव आहे.

- Advertisement -

तुषार घराजवळील मंदिरावर खेळत असताना त्या ठिकाणी परिसरातील लोकांनी वीजेचा आकोडा टाकलेला होता. त्यातील एक आकोडा हा मंदिराजवळ पडलेला होता त्या ठिकाणी तुषार हा खेळत होता आणि खेळता खेळता त्याने ती एक पडलेली वायर हातात पकडली असता त्याला शॉक लागला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. तुषारच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या