Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मांडला विकासाचा रोडमॅप
    महाराष्ट्र

    अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मांडला विकासाचा रोडमॅप

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 26, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या विकासाचा रोडमॅप मांडला सोबतच विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षाचा सूर पाहिल्यावर वाटलं ते भ्रमीतही आहे आणि संभ्रमितही आहे. लोकांना काही मुद्द्यावर संभ्रमीत करायचे म्हणून मुद्दे मांडले जात आहेत. ट्रिलियन डाॅलर इकोनाॅमीबद्दल बोललं जातं आहे. पण आमच्या मनात त्याबद्दल शंका नाही. भास्कर जाधव यांनी अनेक गोष्टी मांडल्या. शिवरायांचा, टिपू सुलतानचा विषय मांडला. टिपू सुलतान चांगले की वाईट यासंदर्भात मुद्दाच नाही. आमचा आक्षेप टिपू सुलतानाची महाराजांसोबत तुलना करण्यात आली त्याला आहे, असा हल्लाबोल यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे.

    दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जीडीपीच्या तुलनेत किती कर्ज असावे? यात देशात सर्वात उत्तम पॅरॅमिटर्स आपले आहेत. जीडीपीतील वाटा कमी झाला वगैरे असं बोलले गेले, मात्र ते रिलेटिव्ह असतं. २०२१-२२ मध्ये देशातील जीडीपीत आपली टक्केवारी १३.१ टक्के, २०२२-२३ १३.५ टक्के, २०२३-२४ मध्ये १३.८ टक्के तर २०२४-२५ मध्ये १४ टक्के इतकी आहे. जीडीपीमध्ये आपला वाटा वाढत आहे. जीडीपीच्या कर्जाच्या सगळ्या पॅरॅमिटर्स महाराष्ट्राने पूर्ण केल्या आहेत, अर्थव्यवस्था समजणाऱ्या नेत्याला आकडेवारी समजून सांगणे योग्य नाही. असं म्हणत त्यांनी यावेळी जयंत पाटील यांना टोला देखील लगावला आहे.

    दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जीडीपीत आपली हिस्सेदारी वाढत आहे. आता दहा औद्योगिक राज्य असली तरीही आपला वाटा वाढतोय. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवा हे आपण करतोय. विरोधकांची कॅसेट गुजरातवरच अडकली आहे. 2022 पासून तेच ते उद्योग बाहेर गेलेत असं विरोधक सांगत आहेत. त्यांनी अभ्यास करून विषय मांडले तर बरं होईल. विरोधक गोबेल्सचं तत्व अवलंबत आहेत. हे सरकार 2029 पर्यंत आहे, पुढच्या टर्मला पण आमचंच सरकार येईल, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान २०३४, २०४७ चे विकसित महाराष्ट्राचे डॉक्युमेंट पाहा, प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार केला आहे. २५ टक्के निधी त्यासाठी डीपीडीसीला द्यावा लागेल. प्रत्यक्ष तो कार्यान्वित करत आहोत. २०४७पर्यंत ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची आहे. दरवर्षी १० लाख रोजगार निर्मिती करायची आहे. प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, वित्तीय शिस्त व शाश्वत विकास या माध्यमातून वित्तीय तूट अडीच टक्क्याखाली आणायची आहे, पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत शोधायचे आहेत. एक व्हिजन मॅनेजमेंट युनिट आपण तयार केले आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    #opposition assembly Budget session Chief Minister Devendra Fadnavis State Development Roadmap Trillion Dollar Economy
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.