लोकशाही न्युज नेटवर्क
राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ (Chief Minister Ladki Bahin Yojana) या खास योजनेची घोषणा केली.
या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना जाहीर झाल्यापासूनच राज्यभरात याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर अनेक त्रुटी दूर करून नव्या बदलांसह या योजनेचे निकष पुन्हा जाहीर करण्यात आले. आता या योजनेसाठी अर्ज करणं आणखी सोपं झालं आहे.
योजनेची घोषणा झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष आणि अटी-शर्थी बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणं आता आणखी सहज आणि सोपं झालं आहे.
सरकारकडून अटी-शर्थी बदलण्यात आल्यामुळे या कागदपत्रांऐवजी इतर ओळखपत्र आणि कागदपत्र देऊन तुम्ही झटपट आणि अगदी सहज या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहात.
योजनेचे नाव : लाडकी बहीण योजना
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
➡️अँप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे
➡️ अँप मध्ये नारीशक्तीचा प्रकार : जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा
➡️अँप मध्ये गेल्यावर सर्वात खाली ४ मेनू दिसतील त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूतवर क्लीक करावे.
➡️ क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर क्लीक करा
➡️ फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्यावी
➡️ माहिती भरताना जन्माचे ठिकाण : ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरावी.
➡️ त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरावी.
➡️ सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना –
आधार कार्ड मध्ये आधार कार्ड
अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये TC/जन्म प्रमाणपत्र (शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे)
➡️ उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
➡️ हमीपत्र
➡️ बँक पासबुक
➡️ सध्याचा LIVE फोटो
वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी.
➡️ त्यानंतर खाली Accept करावे
➡️ माहिती जतन करा वर क्लिक करा
➡️ थोडा वेळ थांबा….तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल
➡️ 4 अंकी OTP टाका
➡️ फॉर्म सबमिट करा.
आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल.
➡️ आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅब वर क्लीक करा.
➡️ तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणता येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज Scheme: pending मध्ये दिसेल.
अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता.