Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»आरोग्य»सुट्या तेलावरील कठोर निर्णयावर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
    आरोग्य

    सुट्या तेलावरील कठोर निर्णयावर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

    तुकाराम मुंढेंच्या कडक कारवाईमुळे व्यापारी वर्गात चिंता
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 26, 2026No Comments364 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमकपणे कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर कठोर निर्बंध लागू करण्याच्या एफडीएच्या निर्णयानंतर व्यापारी आणि लहान विक्रेत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत ग्राहकांच्या सुरक्षिततेसोबत तेल व्यापाऱ्यांच्या हिताचाही वितार करण्यासाठी एसओपी (SOP) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

    एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत मोठी मोहीम सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सुट्या किंवा पॅकिंगशिवाय विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलावर कारवाई करण्यात आली. एफडीएने अशा तेलाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी राज्यव्यापी आदेश जारी केला होता. सुट्या तेलाचा स्रोत, गुणवत्ता आणि त्यात भेसळ झाली आहे की नाही याची खात्री करणं ग्राहकांसाठी कठीण असतं. तपासणीदरम्यान चुकीचं लेबलिंग, तेलात स्वस्त तेलांची भेसळ, परवान्याशिवाय व्यवसाय आणि अयोग्य पद्धतीने तेलाची साठवणूक अशा बाबी आढळल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

    सुट्या तेलावरील कठोर कारवाईमुळे व्यापारी वर्गात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएने SOP तयार करावी, मात्र त्याचवेळी पारंपरिक तेल व्यापार आणि छोट्या विक्रेत्यांवर अनावश्यक परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

    मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएला मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश दिले, जेणेकरून अन्न सुरक्षेची काळजी घेतानाच कायदेशीर व्यवसाय सुरू राहतील. “खाद्यतेलाची गुणवत्ता सुनिश्चित करणारी आणि भेसळ रोखणारी, तसंच पारंपरिक व्यवसायांना सुरू ठेवण्याची परवानगी देणारी एसओपी तयार करून मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश आम्ही एफडीएला देऊ. या व्यवसायांना बंद करण्यास भाग न पाडता सुटे तेल भेसळयुक्त राहील हे सुनिश्चित करणं, हा यामागील उद्देश आहे”, असं फडणवीस बैठकीनंतर म्हणाले.

    तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएची अन्न सुरक्षेविरोधातील मोहीम थांबलेली नाही. मुंबई आणि राज्यातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायांवर तपासण्या सुरू असून अस्वच्छता, कालबाह्य खाद्यपदार्थ आणि इतर नियमभंग आढळल्यास कारवाई केली जात आहे. एफडीएने वारंवर गरम केलेल्या तेलाच्या वापराबाबतही चिंता व्यक्त केली आहे. अशा तेलामुळे आरोग्यासाठी हानिकारक घटक वाढू शकतात, त्यामुळे खाद्य व्यवसायांनी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif