Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»‘छावा’मधील अभिनेत्रीची तीसाव्या वर्षी आत्महत्या
    अपघात

    ‘छावा’मधील अभिनेत्रीची तीसाव्या वर्षी आत्महत्या

    संचिता उगलेने राहत्या घरात संपवले आयुष्य
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 15, 2026No Comments936 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलने स्वत:चे जीवन संपवले आहे. संचिताने राहत्या घरात शेवटचा श्वास घेतला आहे. ती 30 वर्षांची होती. पण संचिताने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. संचिताच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

    रिपोर्टनुसार, अभिनेत्री संचिता उगलेने कथितरित्या आत्महत्या केली आहे. मात्र, तिच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबईतील राहत्या घरात संचिताने स्वत:चे जीवन संपवल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

    संचिता उगले टीव्ही मालिकां आणि चित्रपटांद्वारे हळूहळू आपले नाव कमवत होती. झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’ मध्ये तिने दीया टंडनची भूमिका साकारली होती. या मालिकेने तिला चांगली ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिला आणखी काही मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. तिने दिलवाली दुल्हा ले जाएंगे या मालिकेत देखील काम केले आहे.

    टीव्ही व्यतिरिक्त संचिताने चित्रपट आणि स्ट्रीमिंग प्रकल्पांमध्येही काम केले. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ऐतिहासिक सिनेमा ‘छावा’ मध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती ताराराणीच्या तरुण भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच ती ‘साइलन्स २: द नाईट आऊल बार शूटआऊट’ या चित्रपटाचा देखील भाग होती. या चित्रपटात अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत.

    मे २०२५ मध्ये, संचिताने इन्फ्लुएन्सर मिशा अग्रवाल हिच्या मृत्यूबाबत भाष्य केले होते आणि सोशल मीडियाचे व्यसन तसेच ऑनलाइन मान्यतेचा (व्हॅलिडेशनचा) दबाव यांबाबत चिंता व्यक्त केली होती. या घटनेला हृदयद्रावक म्हणत ती म्हणाली, “तरुण मुले आपल्या आयुष्याबद्दल किती सहजपणे विचार करतात, हे पाहून मला खूप दुःख झाले आहे.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif