भीषण अपघात.. ऊसाचा ट्रक अंगावर पलटला

१७ मजूर दबले, चार जागीच ठार, रात्रीच्या अंधारात रडारड

0

छ. संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात  पिशोर घाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. उसाचा ट्रक अंगावर पलटल्याने उसाखाली दबून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  कन्नड पिशोर घाटात मध्यरात्री 12 ते 1च्या सुमारास हा अपघात झाला. उसाने भरलेल्या या ट्रकमधून एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते. पण घाटात ट्रक येताच अचानक पलटी झाला. त्यामुळे अख्खा उसाचा लोड चार कामगारांच्या अंगावर आला. त्यामुळे हे कामगार जागीच ठार झाले. तर 13 मजुरांचे थोडक्यात प्राण वाचले.

अपघात झाल्यानंतर मजुरांनी एकच आरडाओरड आणि रडारड सुरू झाली. यावेळी गावातील लोक घाटात धावतपळत गेले आणि त्यांनी मजुरांना तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. रात्रीच्या अंधारामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. अपघातामुळे हे कामगार रस्त्यावर कोसळले. त्यांच्यासोबतच उसाचे लोडही खाली आले आणि कामगारांच्या अंगावर आदळले. त्यामुळे चार जण जागीच ठार झाले तर इतर 13 जण जखमी झाले. यातील काहींना किरकोळ मार लागला आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.