खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, वाचा सविस्तर

0

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) तेथून सध्यातरी मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांपासून खा. इम्तियाज जलील यांच्यासह अनेक नामांतर विरोधी संघटनांनी शहराच्या नामांतराविरोधात बेमुदत उपोषण सुरु केलं होते. राज्य तसेच केंद्र शासनाच्या नामांतराच्या निर्णयाला या संघटनांनी विरोध केला आहे. याच आंदोलनााचा भाग म्हणून काल शहरात भव्य कँडल मार्च काढण्यात आला होता. या कँडल मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही खा. जलील यांच्या नेतृत्वात हजारो महिला आणि पुरुषांनी मेणबत्ती घेऊन मार्च केला. यामुळेच खा. इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सिटी चौक पोलीस चौकीत गुन्हा
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने शहरातून कँडल मार्च काढण्यास परवानगी नाकारली होती. तरीही मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांना सोबत घेत कँडल मार्च काढला होता. आता या विरोधात पोलिसांनी खा. जलील आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here