आर्थिक निकषांवर ओबीसींना आरक्षण नको !

ते जातनिहायच हवे : छगन भुजबळ यांचे मत

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ओबीसी म्हणजे कोणतीही एकच जात नसून महाराष्ट्रातील तमाम वंचित आणि शोषित जे सर्व मूलभूत हक्कांपासून स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून सुरू आहे, त्या 374 जातींचा हा बहुजन वर्ग आहे. त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण न देता ते केवळ जातीयनिहाय जनगणनेतून मिळावे तरच या वर्गाला मूळ प्रवाहात आणता येईल असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

गंगा घाटावरील देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे स्व.वसंतराव नेवासकर स्मृतिव्याख्यानात ‘ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना’ या विषयावर भुजबळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष विलास शिंदे, अरुण नेवासकर आदी उपस्थित होते. भुजबळ पुढे म्हणाले की, ओबीसींच्या हक्काची लढाई ही स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी महात्मा फुले यांनी 1869 साली ब्रिटिश सरकारकडे केली. त्यानंतर 1871 साली पहिली जनगणना ब्रिटिश सरकारने केली. 1931 च्या जनगणनुसार 54 टक्के समाज हा इतर मागासवर्गीय असल्याचे समोर आले मात्र त्यानंतर ओबीसींना अजूनही त्यांच्या हक्काचे काहीच मिळाले नाही अशी खंत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.

आर्थिक निकष हे तात्कालीक असतात, एखाद्या व्यवसायाची जर आर्थिक निकषांवर मोजमाप करायचे ठरवले तर एखाद्या वर्षी व्यवसाय खूप चालतो. मात्र कालांतराने हाच व्यवसाय तोट्यात जातो. त्यामुळे बहुसंख्य लोकांचा समाज असलेला ओबीसी हा वर्ग त्यात असणाऱ्या आदिवासी महिला, साळी, माळी, कोळी, अशी असेल की, ही मंडळी आज आपल्या हक्कासाठी लढत आहे. मात्र केवळ आरक्षण नसल्याने ते समाजाच्या मूळ प्रवाहात येत नाहीत. ओबीसी आरक्षण हे केवळ राजकारण झाल्याने आजवर थांबले आहे. महात्मा गांधींनी सुद्धा स्वातंत्र्यानंतर सुराज्य जर मिळवायचा असेल तर केवळ पाच टक्के लोकांचा विकास होऊन भागणार नाही तर असंख्य समुदाय असणारा जो बहुजन वर्ग आहे त्या बहुजन वर्गाला सोबत घेऊन सरकारने विकास करावा अशी मागणी केली होती.

भुजबळ यांनी यावेळी सांगितले की, मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी मोठा लढा दिला. ओबीसींना शिक्षणात नोकरीमध्ये राजकारणात सर्वत्र आरक्षण मिळावे ही मागणी मंडल आयोगाची होती. आपण मंत्री असताना अखिल भारतीय महात्मा फुले सत्ता परिषदेमार्फत ओबीसीच्या न्याय हक्कासाठी दिल्लीच्या जंतर मंतर, रामलीला मैदानावर उपोषण केले. केवळ महात्मा ज्योतिबा फुले यांचा एक फोटो लावून सुमारे तीन लाख लोक आंदोलनासाठी उपस्थित होते. अशा अनेक आठवणी यावेळी भुजबळ यांनी सांगितल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.