शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिराचे शिर्डीत आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली. छगन भुजबळांच्या उपस्थितीमुळे त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आल्याचे बोलले जात होते. परंतु छगन भुजबळांनी आपली नाराजी कायम असल्याचे आपल्या देहबोलीतून दाखवून दिले आहे.
दोन दिवसाच्या अधिवेशनाला हजेरी लावून छगन भुजबळ आता माघारी निघाले आहेत. साधारणत: दोन तास छगन भुजबळ अधिवेशन स्थळी होते. गळ्यात ‘अजितपर्व’चे आयडी घालून छगन भुजबळ अधिवेशन स्थळी दाखल झाले होते. राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक मंत्री, नेत्यांना हे आयडी देण्यात आले होते. यात अजित पवार यांच्याशी संवाद झाला असे विचारले असता त्यांनी ‘नाही’ असे एका शब्दात उत्तर दिले.
छगन भुजबळ अधिवेशनाला आले असले तरी प्रफुल्ल पटेल दोन तास घरी येऊन बसले म्हणून आलो. सुनील तटकरेंनी विनंती केली म्हणून आलो, असे उत्तर देत भुजबळ यांनी आपली नाराजी कायम असल्याचाच आपल्या देहबोलीतून दाखवून दिले आहे. तसेच मी श्रद्धेने वागलो. मात्र मला आश्रद्धेने वागणूक दिली, अशी खंतही छगन भुजबळांनी बोलून दाखविली.