amazon gifts under 20.00 post fruity pebbles cereal coupons touch of class coupon code december 2013 propose gift ideas
Monday, December 5, 2022

केमिस्ट कोहिनूर अनिलभाऊ नावंदर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

- Advertisement -

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे मानद सचिव अनिलभाऊ नावंदर यांचा वाढदिवस काल 11 मे रोजी केमिस्ट बांधवांसह विविध क्षेत्रातील चाहत्यांनी अत्यंत आनंदाने साजरा करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

- Advertisement -

- Advertisement -

यानिमित्ताने बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक महावीर भवन येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला केमिस्ट बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान लोकशाहीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश भेरडे यांनी अनिलभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त लोकशाहीने प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे ज्येष्ठ पत्रकार ना.गो. अनोकार, अनिलभाऊ व सौ. वहिनी तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार व केमिस्ट बांधव व उपस्थित पत्रकार बांधव यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनिलभाऊ यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत त्यांच्या यशस्वी जीवनाचा उलगडा केला. तर चाहत्यांनी अनिलभाऊ यांचा सपत्निक सत्कार करून भावी यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या