धनादेश अनादरप्रकरणी दंडासह एकाला कारावासाची शिक्षा

0

धनादेश अनादरप्रकरणी दंडासह एकाला कारावासाची शिक्षा

चाळीसगाव न्यायालयाचा निकाल

चाळीसगाव प्रतिनिधी

कर्जापोटी एका फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या रकमेचा धनादेश चा अनादर केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने एकाला ८६ हजार रुपयांच्या दंडासह एक महिना कारावासाची शिक्षा चाळीसगाव न्यायालयाने सुनावली.

चाळीसगावातील सचिन भास्कर सोनवणे यांनी श्रीरामसिटी युनियन फायनान्स लि.कडून ३० हजारांचे वैयक्तीक कर्ज घेतले होते. त्याच्या परतफेडीसाठी ‘ फायनान्स कंपनीला सचिन भास्कर सोनवणे यांनी ५६ हजार १५७ रुपयांचा धनादेश दिलेला होता.

हा धनादेश बँकेत टाकल्यानंतर तो वटला नाही. झाल्याने फायनान्स कंपनीतर्फे न्यायालयात त्यांच्या विरोधात दावा दाखल केला. या संपूर्ण दाव्याची चौकशी करुन साक्षी पुरावे तपासले असता, संशयित सचिन भास्कर सोनवणे हे दोषी आढळून आले. .न्यायाधीश एस. डी. यादव यांच्या न्यायालयाने धनादेशाच्या रकमेसह ८६ हजार १५७ रुपयांचा दंड ठोठावुन दंडाची रक्कम फिर्यादी कंपनीला देण्यासह एक महिना करावासाची शिक्षा सुनावली. फायनान्स कंपनीतर्फे अॅड. संदीप एच. सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.