शरीर सुखाला नकार.. कटरने वार अन् अंगावरती 280 टाके

गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ,

0

छ. संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.  स्वारगेट अत्याचार प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नात्यातीलच एका 19 वर्षीय नराधमाने 36 वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली, तिने नकार दिल्याने तिच्यावरती नराधमाने कटरने वार केला.त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. या भयंकर वेदना सहन करत पीडित महिला एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

पिडीतेने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक तात्याराव नवपुते (वय-१९) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नराधम हा माझा पाठलाग करत होता. त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं होतं. मात्र रविवारी संध्याकाळी मी शेतातील काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक त्यांने माझी वेणी ओढली आणि डोकं दगडावर आपटलं. त्यानंतर मला काही समजण्या आधीच त्याने कटरने माझ्या तोंडावर वार केला.त्यानंतर मी ओरडायचा प्रयत्न केला तर त्याने माझ्या गळ्यावरच वार केला यामध्ये माझे कपडे देखील फाटून गेले. त्यानंतर त्याने मोठा दगड उचलून माझ्या अंगावर मारला आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. काही वेळाने मी एक डोळा उघडायचा प्रयत्न केला पण अंगभर सुरू झालेल्या ठणकामुळे डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. ज्यावेळी शुद्धीत आले त्यावेळी डोळा उघडत नव्हता थोड्या वेळाने लक्षात आले की दोन्ही हातात सलाईन लावलेलं होतं, माझ्या अंगावर तब्बल 200 टाके घालावे लागले आहेत. यासाठी लागणाऱ्या दोऱ्याचा खर्चच 22 हजार इतका आला आहे. मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वा दोन फुटाचा एक वार आहे. शरीरावर अशी एकही जागा नाही की तेथे वार केलेला नाही. घरातील परिस्थिती जेमतेम आहे सासर प्रमाणेच माहेरची परिस्थिती सुद्धा हलाखीची आहे. उपचार करण्यासाठी पैसे पैसे देखील नाहीत, अशी माहिती पीडितेने दिली आहे. या घटनेने परिसरात हळवळ व्यक्त केली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.