चॅट जीपीटी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्समुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे – डॉ. सोमनाथ वडनेरे

0

माउंट अबू ;- सोशल मीडियाचा अविवेकी वापर, चॅट जीपीटी, कृतीम बुद्धीमत्ता अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स यामुळे मानव समाज विचारांच्या यांत्रिकीकरणाच्या दिशेने जात असून हे माध्यमातील सर्वांत चिंताजनक अभिसरण आहे. यासाठीच माध्यमांनी मूल्याधिष्ठीत समाज निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माऊंट आबू येथे ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागामार्फत राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.

जागतिक शांती आणि सदभावनेसाठी सशक्त मीडिया विषयावर भारत आणि नेपाळ देशातील 1500 पत्रकारांचे माध्यम संमेलन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रानंतरच्या नियोजन सत्रात सोशल मीडियाचा समाजावरील प्रभाव या विषयावर मंथन करण्यात आले. मुख्य बीज भाषण जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.

`टुल्स` दोषी नसून `युजर` दोषी :

मुख्य संबोधनात त्यांनी सोशल मीडियाचा अविवेकी वापर, कृतिम बुद्धीमत्ता आणि चॅट जीपीटी सारख्या साधनांच्या वापरामुळे जागतिक पातळीवर होणा·या मानव समाजावरील प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली. टेक्नॉलॉजीचे `टुल्स` अर्थात साधने दोषी नसून `युजर` अर्थात वापरकर्ता दोषी असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी बी.के. निकुंज, राष्ट्रीय समन्वयक मीडिया प्रभाग, मुंबई यांनी माध्यमांनी भाव आणि भावनाच्या आधारे वृत्तांकन करावे याबद्दल आपले विचार व्यक्त केले. या सत्रात वाय. बाबजी, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, हैद्राबाद, बी.के. नाथूमल, कटक, डॉ. पी. शिवस्वरुप, इग्नो, नागपूर, डॉ. आरती त्रिपाठी, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, दिल्ली, डॉ. कमलेश मीना, पटना, डॉ. अवा शुक्ला, अहमदाबाद आदिंनी आपले समायोचित विचार मांडलेत. सत्राची अध्यक्षता डॉ. नरेंद्र कौशिक, जयपूर पत्रकारिता विद्यापीठ यांनी केले. बी.के. योगीनी, अजमेर यांनी सत्र संचलन केले.

महाराष्ट्रातून चारशे माध्यम प्रतिनिधींचा सहभाग :

राष्ट्रीय मीडिया संमेलनात महाराष्ट्र राज्यातून विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, एफ. एम. रेडिओ, कम्युनिटी रेडिओ, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, समाज माध्यमे आदि मिळून सुमारे 400 हून अधिक मीडिया प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला असून महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयनाचे काम डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे. 12 डिसेंबर पर्यंत चालणा·या राष्ट्रीय संमेलनात अनेक माध्यम तज्ज्ञ, प्रकाशक, मालक यांनी जागतिक शांतीसाठी माध्यमांच्या योगदानाबद्दल चर्चा करतील.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.