रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून सोन्याचे दागिने जप्त

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पीएसआय विनोद भुरले व पोलीस स्टाफ पोलीस स्टेशन, रामनगर ह‌द्दीत पेट्रोलीग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, तीन  इसम हे घरफोडी केली असुन संशईतरित्या स्यतवारी कॉलरी, चंद्रपुर येथे फिरत आहे. दिलेल्या माहीनुसार आरोपी  राकेश सुब्रहमण्यम सानिपती (वय ३४, रा. तेलगु शाळेजवळ रयतवारी कॉलरी), विश्वजीत बिमल सिकदर (वय ३२, धंदा मजुरी, रा. बंगाली कॉम्प, पाण्याचे टाकीजवळ), दिपक राजु भोले ( वय २१, शांतीनगर, बंगाली कॅम्प) यांना ताब्यात घेवुन विचारपुस केले असता त्यांनी यापुर्वी पोलीस स्टेशन, भद्रावती तसेच पोलीस स्टेशन, रामनगर येथे घरफोडी केल्याचे सांगितले.

त्यावरून नमुद आरोपीतांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी घरफोड्या करून चोरी केलेले सोन्याचे दागिने हे सराफा सोनार नामे मनोज पवार, रा. सराफा लाईन, चंद्रपुर यास विकी केले असे सांगितले. वरून नमुद सराफा दुकानदार यांचेकडुन व इतर आरोपीकडुन सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण ३ लाख ७१ हजार ३०० रूपयाचा माल जप्त केला आहे. सदर आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन, रामनगर, दुर्गापुर, चंद्रपुर शहर येथे चोरी, घरफोडी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपीताना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रानुसार प्राप्त झाली.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि. संतोष निंभोरकर, सतिश अवयरे, संतोष येलपुलवार, गोपीनाथ नरोटे , नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.