Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये चंद्रपूरच्या खेळाडूंचा दबदबा
    क्रीडा

    राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये चंद्रपूरच्या खेळाडूंचा दबदबा

    मलेशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ५ जणांची निवड : आयुषी स्पोर्ट्स अकादमी व चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलंबम असोसिएशनचे ऐतिहासिक यश
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 19, 2026No Comments29 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    प्राचीन भारतीय पारंपरिक शस्त्रकला क्रीडा प्रकार असलेल्या सिलंबममध्ये चंद्रपूर जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. मागील पाच वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागात सिलंबम या शिवकालीन शस्त्रकलेचा सातत्याने प्रसार करणाऱ्या चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलंबम असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपूर यांच्या अथक प्रयत्नांना आता सुवर्ण यश प्राप्त झाले आहे.

    विदर्भाच्या इतिहासात प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल पाच सिलंबम चॅम्पियन खेळाडूंची ऑगस्ट 2026 मध्ये मलेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल सिलंबम चॅम्पियनशिपसाठी निवड झाली असून, जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. इंटरनॅशनल सिलंबम फेडरेशन, मलेशिया संलग्न सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया व सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सुवर्ण यश संपादन केले.

    या स्पर्धेत आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपूर व आयुध स्पोर्ट्स अकादमी, भद्रावतीच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत चमकदार कामगिरी केली. दीक्षांत दुर्गराज रामटेके यांनी ३ सुवर्ण व १ रौप्य पदक, दीक्षांत महेंद्र सोनारकर यांनी ४ सुवर्ण पदके, हर्ष राजुरकर यांनी ३ सुवर्ण पदके, मित राजुरकर यांनी १ सुवर्ण व २ रौप्य पदके, तर अर्णव बाबा कोटनाके यांनी १ सुवर्ण व २ कांस्य पदके पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढविला. सिंगल लाठी रोटेशन, लाठी-काठी फायट, तलवार रोटेशन, सुरुल रोटेशन, एम्प्टी हॅण्ड काता आदी स्पर्धा प्रकारांमध्ये या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन सादर केले.

    या यशामागे विदर्भ विभाग प्रमुख व सिलंबम खेळाचे मार्गदर्शक मास्टर दुर्गराज एन. रामटेके यांचे विशेष योगदान मानले जात आहे. त्यांच्या पुढाकाराने दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी अंकुर विद्या मंदिर स्कूल, आयुध निर्माणी चांदा वसाहत, भद्रावती येथे विदर्भस्तरीय सिलंबम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात इंटरनॅशनल सिलंबम फेडरेशन, मलेशियाचे मान्यताप्राप्त प्रशिक्षक संजय बनसोडे सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले होते.

    खेळाडूंच्या या ऐतिहासिक यशाबद्दल विदर्भ विभाग प्रमुख दुर्गराज रामटेके, जिल्हा संघटनेच्या संस्थापक व अध्यक्षा शीतल रामटेके, सचिव बी. एल. करमनकर, टीम मॅनेजर अशोक कामडे, करण डोंगरे, संजय माटे, राकेश राय, एएसए सचिव आयुषी रामटेके तसेच खेळाडूंच्या पालकांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. या यशाबद्दल चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलंबम असोसिएशन, आयुषी स्पोर्ट्स अकादमीचे पदाधिकारी, सदस्य तसेच जिल्ह्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर

    August 19, 2026

    स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

    August 4, 2026

    राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतासाठी सुवर्णसंधी

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif