चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
चंद्रपूरमध्ये गांजा विक्री करणारा व्यवसायिक LCB च्या सापळ्यात अडकला आहे. पोउपनि मधुकर सामलवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लालचंद केसकर रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपुर हा गांजा अंमली पदार्थाचा व्यवसायीक असुन तो बल्लारपुर येथुन चंद्रपुर येथे त्याच्याजवळील होंडा ॲक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३४ सी.एल. ५०२५ च्या डीक्कीमध्ये अवैधरित्या गांजा वाहतुक करणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने बल्लारशा ते चंद्रपूरकडे जाणाऱ्या रोडवर चुनाभट्टी बस स्टाप येथे सापळा रचला.
यावेळी माहिती मिळाल्यानुसार ईसम लालचंद केसकर ॲक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३४ सी.एल. ५०२५ ने चंद्रपूरकडे येताना दिसला. त्याची एनडीपीस कायद्या अंतर्गत तपासणी केली असता, सोबत असणाऱ्या दुचाकी मोपेड वाहनाचे डिक्कीत ५ किलो ४७८ ग्रॅम हिरवे गांजा वनस्पतीची पाने/फुले/बिया मिळुन आले. सदर इसमास ताब्यात घेवुन गुंगीकारक औषधी द्रवे व मनोव्यापारावर परीणाम करणारा पदार्थ असल्याने आरोपींविरुद्ध कारवाई केली.
या प्रसंगीआरोपी लालचंद गणेश केसकर( वय ६४, धंदा मजुरी, रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपुर, ता. जि. चंद्रपुर) आपल्या आर्थिक फायद्याकरिता त्याच्या ताब्यातील होंडा अॅक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३४ सी.एल. ५०२५ मध्ये मनोव्यापारावर परीणाम करणारे घटक असलेला गांजा वनस्पतीचे पाने फुले व बिया अवैधरित्या विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असतांना मिळून आले. अधिनियम (N.D.P.S.Act) १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), अन्वये होत असल्याने आरोपीकडुन एकूण १ लाख ८२ हजार रूपयांचे मुद्देमाल जप्त करून पोस्टे बल्लारशाह येथे आरोपी विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोस्टे बल्लारशाह करीत असल्याची माहीती सूत्रानुसार प्राप्त झाली.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि, संतोष निंभोरकर, पोहवा /सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा रजनिकांत, पोहवा चेतन, पोहवा महंतो, पोशि प्रशांत, पोशि प्रफुल, पोशि १२३९ किशोर वाकाटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.