चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर परीसरातील बाबुपेठ गार्डन आणि कामगार चौक परिसरात दोन युवकांना गांजा चिलममध्ये भरून सेवन करीत असतांना दिसतात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना ताब्यात घेत जेरबंद केले. दरम्यान त्यांचा विरुद्ध कलम २७ एन. डी. पी. एस अॅक्ट नुसार वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहीती पोलीस सूत्रानुसार प्राप्त झाली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमलवार, संतोष येलपुलवार, सुरेंद्र महंतो, सतीश अवथरे, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, प्रमोद कोटनाके, मिलींद टेकाम यांनी केली.
तसेच नागरीकांना आवाहन जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, अंमली पदार्थ खरेदी – विक्री तथा सेवन बाबत कसल्याही प्रकारची माहीती असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर यांना ११२ नंबर डायल करावा. जेणेकरून नशा मुक्तीस सहकार्य करण्यात येईल.