चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील रेती घाटाचा लिलाव झाला नाही त्यामुळे काही का होईना या अवैध रेती चोरी प्रकणात जास्तीत जास्त सुशिक्षित तरुण युवक या व्यवसायाच्या विळख्यात येत असल्याचे बोलले जात आहे. कमी पैशात जास्त मुनाफा कसा मिळवायचा म्हणून टोळके बनवुन गावातील गुंडाच्या मदतीने रेती तस्कराचा बोलबाला होत असल्याचे दिसून येत आहेत.
राजुरा, भद्रावती तालुक्यात काही घाटातून वन संपत्तीचे म्हणा किंवा शेताचे नुकसान करीत हे रेती तस्करी करीत आहे. रेती तस्करीसाठी वाहतुक मार्गे काढण्याकरिता गावगुंडांची मदत घेऊन रस्ता मोकळा करीत आहे. स्थानिक भाईलोकांची किंवा पोस्टर नेत्यांची पण गरज भासते म्हणून तस्करांची हिम्मत सुध्दा वाढली. हे तस्कर आपल्या नेत्यांसोबत प्रसिध्दी पोस्टर (बॅनर) झाडावर टांगून आपली ओळख दाखवतात. रेती व्यवसायाच्या मैदानात जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उतरले असल्याचे पण कारवाई दरम्यान दिसतात.
अवैध रेती वाहतूक करीत असतांना मात्र वाहकासह क्लिनरवर कारवाई केली जाते. चोराला सोडून संन्याशाला सजा मिळतेच असे नागरीकांत बोलले जाते. असे असतांना अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रणाकरीता महसूल विभाग पोलिस विभाग सक्रिय झाला असतांना भद्रावती पोलिसांना मौजा जेना नाल्यातून जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टर, हायव्हामध्ये वाळू उपसा करीत करीत असल्याची गोपनीय माहीत मिळाली असता क्षणाचा विलंब न करीत माहीताच्या आधारे पंचासह घटनास्थळावर छापा टाकून ७ ब्रास रेती ,२ ट्रॅक्टर, हायव्हा, जेसीबी असे काॅलम क्रमांक ०७ नुसार ६३ लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपी प्रणय अनंता पेके (वय २९, रा.चारगाव खुर्द वरोरा, धंदा ड्राइवर), प्रतिक गजानन माहुरे (वय२९), मोहम्मद फिरोज समेद्दिन सिध्दकि (वय २८, रा. माजरी काॅलरी क्र.२ भद्रावती, चालक), सुशांत मुकिंदा कुडमेथे (वय २४ रा. किलोनी त.भद्रावती) यांना अटक केली. दोन आरोपी फरार असल्याचे पोलिस सूत्रानुसार माहीती प्राप्त झाली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात, पो. अ. वृषभ काटकर, अमोल काचोरे यांचा नेतृत्वात, विठ्ठल काटकर, चालक नांदेकर, उप.कार्या. वरोरासह, A.P.I. संजय मिश्रा, अनुप आष्टणकर, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, विजय उपरे यांनी केली.