Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»लोकमान्य विद्यालय, भद्रावती पोलिसांच्या संयुक्त उपक्रमात देशभक्तीचा जयघोष..!
    महाराष्ट्र

    लोकमान्य विद्यालय, भद्रावती पोलिसांच्या संयुक्त उपक्रमात देशभक्तीचा जयघोष..!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 14, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकमान्य विद्यालय; भद्रावती पोलिसांच्या संयुक्त उपक्रमात देशभक्तीचा जयघोष..!

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भद्रावती येथील लोकमान्य विद्यालय आणि भद्रावती पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५० वर्षे पूर्ण झालेल्या राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ च्या उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांकडून सामूहिक वंदे मातरम गायनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या या ऐतिहासिक गीतामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढवणे हा होता.
    हा उपक्रमचा प्रारंभ लोकमान्य विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आला, जिथे विद्यार्थ्यांनी मनोभावे वंदे मातरम गायन केले.
    या उपक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर किरमिरे यांनी केले.
    यावेळी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्राचार्य रूपचंद धारणे, शिक्षक सचिन सरपटवार, अमित गुंडावार, पोलिस स्टेशन भद्रावतीचे एपीआय वीरेंद्र केदार, पीसी किरण चांदणे, पीसी भूषण चौधरी, डब्ल्यूएचसी सुकेशनी चालखुरे, डब्ल्यूपीसी पूजा पंधरे आणि संपूर्ण शिक्षकवर्ग उपस्थित होता.
    या प्रसंगी एपीआय वीरेंद्र केदार यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व मोबाईल फोनच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन केले, जे सध्याच्या डिजिटल युगात अत्यंत आवश्यक होत आहे.
    यानंतर, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष तथा समाजसेवक चंद्रकांत गुंडावार यांनी “संघ” विचार, राष्ट्रभक्ती आणि ‘वंदे मातरम’ या गीताच्या महत्त्वावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी राष्ट्रबांधवतेची शपथ घेणारे वंदे मातरम हे गीत केवळ सांगीतिक कृति नव्हे तर स्वातंत्र्यलढ्याचा प्रेरणास्त्रोत असल्याचे स्पष्ट केले.
    या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान आणि देशभक्तीची जाणीव अधिक दृढ करण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला. आभारप्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif