चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
नागपूर येथे आयोजित ऐकतेतुन बळ, परंपरेचा अभिमान असे प्रतिपादन प्रेरणादायी कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते.
यावेळी समाज बांधवांनी केलेल्या सत्काराचा वेळी कोणताही समाज प्रगत झाला, तर त्याचा सकारात्मक परिणाम केवळ त्या समाजापुरता मर्यादित राहत नाही. त्या समाजाचा परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि अखेरीस देशही त्या प्रगतीचा लाभार्थी होतो. तसेच प्रत्येक समाजाने शिक्षण, संघटन आणि सांस्कृतिक जपणूक यावर भर देऊन आपला सर्वांगीण विकास साधावा. कारण समाजोन्नती हीच राष्ट्रोन्नतीची खरी गुरुकिल्ली आहे असेही यावेळी म्हणाले.

