चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये भद्रावती शहरातील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकाल देत आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून आपली शंभर टक्के निकाल देण्याची परंपरा लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाने कायम राखली आहे. कला शाखेचाही निकाल उल्लेखनीय आलेला असून यामध्ये विज्ञान शाखेतून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान सिद्धार्थ संजय ठावरी या विद्यार्थ्याला मिळाला असून त्याला ८३.५० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. आर्शिया सादिक शेख हिने ८३.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. कशिश रमेश भसारकर हिने ७८.१७ टक्के गुण मिळवून करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. कला शाखेतून प्रथम आलेली आचल नागपुरे हिला ७७.५० टक्के गुण मिळाले. स्नेहा नेहारे हिला ७३.१७ टक्के गुण मिळाले असून तीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर, मनोज बावणे हा ७३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांकावर राहिला आहे.
याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार तसेच शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य गोपाल ठेंगणे, अविनाश पांपट्टीवा, संजय पारधे, लोकसेवा मंडळाचे नवनियुक्त कार्य सचिन सरपटवार आणि लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रूपचंद धारणे, उपप्राचार्य श्री प्रफुल वटे तसेच पर्यवेक्षक एस रमेश आसेकर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सत्कार सोहळयात विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून त्यांचे कौतुक करण्यात आले. मुख्य म्हणजे या कौतुक सोहळ्याला विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते या कौतुक सोहळ्यात पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका स्वाती गुंडावार मॅडम यांनी केले असून आभार प्रदर्शन लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख नितीन लांजेवार यांनी केले.