लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रुपचंद धारणे

प्रफुल्ल वटे उपप्राचार्य, रमेश आसेकर पर्यवेक्षक

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर  येथील लोकसेवा मंडळातर्फे संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रुपचंद धारणे यांची  व्यवस्थापन मंडळाने प्राचार्यपदी नुकतीच नियुक्ती केली असून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.

लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार हे नियत वयोमानानुसार दि.३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी उपप्राचार्य रुपचंद धारणे यांना नियुक्त करण्यात आले. तर पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे यांची उपप्राचार्य पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच पर्यवेक्षक पदावर ज्येष्ठ शिक्षक रमेश आसेकर यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसेवा मंडळाच्या कार्यालयात एका छोटेखानी समारंभात मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी या तिन्ही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून अभिनंदन केले व त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांनी आपापल्या पदाची सुत्रे स्वीकारली. यावेळी व्यवस्थापन मंडळाचे आभार मानत या तिन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आपल्या मनोगतातून दिली.

यावेळी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सहसचिव अमित गुंडावार, मंडळाचे संचालक गोपाळराव ठेंगणे, उमाकांत गुंडावार, अविनाश पाम्पट्टीवार, संजय पारधे, माजी प्राचार्य सचिन सरपटवार, लोकमान्य ज्ञानपीठाच्या प्राचार्या पूनम ठावरी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.नितीन लांजेवार यांनी केले.तर आभार शिक्षक विशाल गावंडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.