सोयाबीन वडी पोत्यांच्या आड बनावट दारूची विक्री करणारे अटकेत

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका हद्दीत पेट्रोलिंग पेट्रोली करताना गोपनीय माहिती मिळाली की, एका आयशर वाहनामधे अवैधरित्या बनावट देशी विदेशी दारु विक्री करिता चंद्रपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात जात आहेत.

प्रसंगी खात्रीशीर माहितीवरुन पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना घटनेची माहिती देऊन आदेशानुसार तीन वेगवेगळे पथक तयार करून वर्धा चंद्रपूर सीमेपासून सापळा रचला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वर्णनात्मक आयशर ट्रकचा पाठलाग केला.

यशस्वी नियोजन सापळ्यात पोलीस स्टेशन चिमूर मौजा शिवापूर (बंदर ) हद्दीत NH ३५३ वर सदर आयशर ट्रक क्रं. CG ०८ AY ९९४८ या वाहनास ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता ट्रकमध्ये सोयाबीन वडी पोत्यांच्या आडोश्यात बनावट देशी दारूच्या प्रत्येकी ९० मिली ३५ हजार निपा (३५० दारू पेट्या) किंमत १२ लाख २५ हजार, Hayward’s ५००० कंपनीचाच्या बियरच्या २१६० कॅन (९० पेट्या ) किंमत ३ लाख ४५ हजार ६०० रूपये, रॅायल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूच्या ४ हजार ३२०निपा (९० पेट्या ) किंमत ११ लाख २३ हजरा२०० रूपये सोबत एक आयशर ट्रक क्र. CG 08AY 9948 किंमत २० लाख रूपये असा एकूण ४६ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

मात्र तीन आरोपी विशाल कमलदेव उईके (वय २६, रा.पाथरी ता. साकोली जि. भंडारा) , पप्पू परशराम वाघाडे (वय २०, रा. साकोली जि. भंडारा) , सुरेश गोलुजी ईनवाते (वय ५०, रा. नालंदा नगर टेका नाका नारी रोड नागपूर) यांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

आरोपितांविरूध्द पो.स्टे. चिमूर येथे कलम ३१८(४), ३३६(२), ३३६ (३) ३४० (२) ४९ भारतीय न्याय संहीता सहकलम ६५ अ (ई), ८३ म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यांचा अमोल काचोरे यांचे नेतुत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, सपोनी झाडोकर, पोउपनी संतोष निंभोरकर, सफौ स्वामीदास चालेकर, पो हवा. नितीन साळवे, जयंता चुनारकर, प्रकाश बल्की, जयसिंग, संजय वाढई, अजय बागेसर, गणेश मोहुर्ले, नापोशी संतोष येलपुलवार, प्रसाद धुळगंडे, गोपाल अतकुलवार, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.