अवैध तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला अटक

भद्रावती पोलीसांची कारवाई

0

चंद्रपूर लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात बंदी असलेला गुटखा जिल्ह्यातील पानटपऱ्यांवर सहजपणे कसा उपलब्ध होतो ? असा प्रश्न पडतोय. परंतु प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री व तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी भद्रावती पोलीसांनी आता कंबर कसली आहे. तसेच बंदी असलेला पण परराज्यात उत्पादित होणारा सुगंधित तंबाखू आदी पदार्थ अन्न व औषध प्रशासन अधिकारी कारवाई करीत आहे की नाही, असा नाही प्रश्न उपस्थित होतो ? जिल्ह्यातील हाच सुगंधित तंबाखूजन्य आदी पदार्थ अगदी सहजतेने उपलब्ध होतो. विकणाऱ्यांवर कारवाई पण होत असुन त्याची विक्री कमी होत नाहीय असे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसताना अन्न व औषध प्रशासन कारवाई करण्यात असमर्थ ठरत आहेत.

मात्र या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रीकडे आता तालुक्याच्या हद्दीत भद्रावती पोलीसांनी  मोर्चा वळविला असून पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस निरीक्षक वनिता वाडीवे यांना माहिती देऊन तालुक्यातील मौजा चंदनखेडा गावातील एका महिलेच्या (वय ५४) घरी मिळालेल्या माहितीनुसार पंचासमक्ष घटनास्थळावर धाव घेतली. सदर महिला घरीच हजर असल्याचे दिसून येताच पंचासमक्ष विचारपूस केली.

प्रसंगी तपासाअंती साठवणूक खोलीत सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला.  पंचासमक्ष आरोपी महिला विरुद्ध भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत अन्न व सूरक्षा कायदा मानके २००६ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून ७५ हजार ३७५ रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. असल्याची माहिती पोलीस सूत्रानुसार प्राप्त झाली.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचा नेतृत्वात अनुप आष्टणकर, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, योगेश घाटोळे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.