चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
भद्रनाग युथ फाऊंडेशनतर्फे समता स्वतंत्रता विश्वबंधुत्व या तीन तत्त्वावर आधारित जीवन मार्ग म्हणजे लोकशाही. महामानव समाज सुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय, समानता व बंधुत्व वृध्दिगत करण्याकरिता आपले जीवन समर्पित केले. त्यांनी विषमतेविरूध्द दिलेला लढा हा ऐतिहासिक होता. या देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज आपणा सर्वांना अनेक अधिकार बहाल झाले असून या घटनात्मक अधिकारांनीच बहुजन समाजाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व अन्य क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. एवढेच नव्हे तर आपला देश सुध्दा संविधानाच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.
त्यामुळे बाबासाहेबांच्या महान विचारांचा वारसा स्विकारून सर्वांनी राष्ट्राच्या जडणघडणीत व प्रगतीमध्ये योगदान देणे हीच या महान राष्ट्रपुरूषास खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन मुनाज शेख यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मुणाज शेख, भद्रनाग युथ फाऊंडेशन अध्यक्ष फयाज शेख रोशन कोमरेद्दीवार, निखिल जगताप, प्रथम शेंडे, पंकज चीलके, रोहित साखरकर, सिद्धार्थ नरवडे, अजय कावळे, दानिश शेख, आदू शेख , रेहान शेख, अकमल , असिफ आणि सर्व भद्रनाग युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.