चकलापेठ येथील दुचाकी चोरटा गजाआड

0

 चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुल तालुकासह आसपासच्या परिसरातील वाहन चोरी करणारा सराईताला स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकांनी अटक केली आहे. त्यांचाकडून चोरीस गेलेली स्पेंलंडर प्रो. मो. सां. MH 34 CM 1353 क्रमांकाची दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथक यांना दुचाकी वाहन चोरीस गेलेल्या गुन्हा उघडकीस आणण्यास मोठे यश आले आहे. सराईताकडून ७५ हजार रुपयांपर्यंत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

प्रकाश आनंदराव मेडपल्लीवार (वय ३२, रा. चकलापेठ ता. चामोर्शी जि. गडचिरोली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत अप.क्र. १२६/ २०२५ कलम ३०३ (२) BNS नुसार गुन्हातील असता आरोपीस मुद्देमालसह पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन सिंदेवाही यांचे ताब्यात देण्यात आले असल्याची माहीती पोलीस सूत्रानुसार प्राप्त झाली.

तसेच सदरील आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन गडचिरोलीत पण दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असून २ वर्षाची शिक्षा झाली असल्याची माहीती सूत्रानुसार प्राप्त झाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतुत्वात API बलराम झाडोकर, PSI संतोश निंभोरकर, HC जय सिंह, संतोश येलपुलवार, गणेश मोहुर्ले, नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे, दिनेश अराडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.