चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील बल्लारपूर तहसिल कार्यालय (वर्ग १) तहसीलदार अभय गायकवाड आणि पटवारी सचिन पुकळे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी लाच रक्कम स्वीकार केल्याबद्दल कारवाई केल्याची माहीती प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मौजा कोठारी तालुका बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असुन बिल्डींग मटेरिअल सप्लायरचा व्यवसाय करतात. तसेच तक्रारदार यांची मौजा कवडजई, बल्लारशाह येथे शेती असुन २३ मार्च २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. च्या सहाय्याने त्यांचे शेतातील माती, मुरूम काढून शेताचे लेवलींगचे काम करीत असतांना कवडजई साजाचे तलाठी सचिन व बल्लारशाह तहसीलचे तहसीलदार गायकवाड यांनी तक्रारदार यांना माती, मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने शेतात असलेले २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. जप्त न करण्याकरीता तसेच तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता तहसीलदार यांचेकरीता २ लाख रूपये तलाठी करीता २० हजार रूपये असे एकुण २ लाख रूपये २० हजार रूपये लाचेची मागणी केली.
यावेळी त्याचदिवशी तलाठी सचिन व तहसीलदार गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडून १ लाख १९ हजार ९०० रूपये स्विकारले असतांना मागणी केलेल्या रक्कमेपैकी उर्वरित १ लाख रूपये देण्याकरीता तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडे तगादा लावण्याने तक्रारदार यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून दि. २६ मार्च २०२५ रोजी ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
या प्रसंगी दिलेल्या तक्रारीवरून २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे अभय अर्जुन गायकवाड, तहसीलदार, तहसील कार्यालय बल्लारपूर (वर्ग १) यांनी दिलेल्या प्रोत्साहनावरून आलोसे सचिन रघुनाथ पुकळे, तलाठी – कवडजई साजा, ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर (वर्ग ३) यांनी तक्रारदार यांना तडजोडी अंती ९० हजार रू. मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवीली. त्यावरून आज १ एप्रिल २०२५ रोजी सापळा रचुन कारवाई करीता तक्रारदा यांना आलोसे अभय गायकवाड यांचेकडे पाठविण्यात आले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारण्यास नकार दिला.
त्यावरून आज दिनांक ०१ एप्रिल २०२५ रोजी पो.स्टे. बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असुन आलोसे अभय अर्जुन गायकवाड, तहसीलदार याना ताब्यात घेण्यात आले असता आलोसे सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्याने शोध पथक रवाना करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ. दिगंबर प्रधान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे ला.प्र.वि. नागपूर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. सचिन कदम नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टाफ पो. हवा. रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पो.अं. अमोल सिडाम, प्रदिप ताडाम व चापोशि सतिश सिडाम यांनी यशस्वी केल्याची सूत्रानुसार प्राप्त झाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर,