चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील शहर ग्रामीण भागात काही दिवसांपासून चोरीचा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक चोरीच्या प्रकरणांमध्ये विश्वासू व्यक्तीचा किंवा नोकराचा सहभाग असल्याचे अधिक तपासाअंती लक्षात आले.
अशीच एक घटना चंद्रपूर शहर परिसरात घडली. घुटकाळा वार्ड येथील भंगार व्यवसायिक यांनी चंद्रपूर शहर हद्दीत विश्वासू नोकर सुपरवायझर रफिक शेख (रा. रहमतनगर वार्ड चंद्रपूर) याला १७ लाख रूपये घरी पोहचविण्यास सांगितले. यावेळी तेव्हा त्याच्या डोळ्यात कोणीतरी अज्ञाताने लाल मिर्ची पावडर फेकुन त्याच्या जवळील संपुर्ण १७ लाख जबरीने हिसकावून पळून गेला असल्याची माहिती भंगार व्यवसायीक यांनी चंद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्याद दाखल करून रिपोर्ट वरून अपराध क्र. २२०/ २५ कलम ३११ वि. एन. एस. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
याप्रकरणी लक्ष घालून पोलीस निरीक्षक प्रभावती ऐकरकुरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि. संदीप बच्छीरे आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. यावेळी रफीक शेख याला घटनाक्रम विचारपूस करीत असतांना पोलीसांना संशयास्पद बोलत असल्याने त्याची कसून विचारपूस केली, त्याने आपला लहान भाऊ शफिक रज्जाक शेख याच्या मदतीने चोरी केल्याचा जबाब दिला.
यावेळी सदरील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात पोलीसांना यश आले आहे. त्यांचाकडून रोकड १७ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि गुन्हात वापरलेली मोपेड दुचाकी वाहन, २० हजार रुपयांचे गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन असा एकूण १७ लाख ७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. रफिक शेख रज्जाक शेख (वय ३५ ), शफिक रज्जाक शेख (वय ३२ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असल्याची माहिती पोलिस सूत्रानुसार प्राप्त झाली.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकरकुरे यांच्या सुचनेप्रमाणे पो. उप निर. संदीप बच्छिरे, सचीन बोरकर, संतोषकुमार कनकम, भावना रामटेके, कपुरचंद खरवार, ईम्रान खान, दिलीप कुसराम, ईर्शाद खान, विक्रम मेश्राम यांनी केली. सदर गुन्हाचे पुढील तपास पो. उ. नि. संदीप बच्छिरे करीत आहेत.