शेतशिवारात जुगार खेळणारे ताब्यात

भद्रावती तालुक्यात शेतशिवारातील घटना

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

भद्रावती तालुक्यातील पिरली गावा लगत शेतशिवारात पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केल्याची माहीती प्राप्त झाली. अवैध बेकायदेशीर व्यवसायातून अमाप पैसा खुप “घाम गाळून” कमवला असे या तालुक्यातील वाईट काॅलरचे काम. स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या संख्येत वाढ झालीच त्यातूनच किरायाच्या गावगुंडांकडून सुद्धा नागरीकांना होणारा मानसिक त्रास. यावेळी त्यांना कुठेतरी आळा घातले असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले. येथील  झालेल्या भद्रावती पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लता वाडवे यांचे धाडसञ मोहिम सुरू झाल्याची सुध्दा चर्चा स्पष्ट नागरीक करीत आहेत.

दरम्यान भद्रावती पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, पिरली गावालगत असलेल्या शेतशिवारात जुगार खेळत आहेत. या माहितीचा आधारावर शेतशिवारात सापळा रचून जुगार खेळत असलेल्या ठिकाणावर सापळा रचुन जुगार खेळणाऱ्यांना शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले.

याप्रसंगी गजानन शंकर खापने (वय २८, रा. धानोली),  सुभाष सदाशिव आसुटकर (वय ४५, रा. पिरली), मंगेश उर्फ सुभाष धनराज मोहुर्ले (वय २९, रा. पिरली), यांना ताब्यात घेत जेरबंद केले. घटनास्थळावर वरून २ लाख ५ हजार ५०० रूपयांचा रोख रक्कमसह दुचाकी वाहन व इतर मुद्देमाल जप्त करून भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

तर यापैकी आशिष काडे, साहील आमने, सचिन देठे, शुभम काकडे, सतीश पूरी हे आरोपी फरार असून  पोलीस या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत असल्याची माहीती येथील सूत्रानुसार प्राप्त झाली.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी, नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात महेंद्र बेसरकर, अनुप आष्टणकर, विश्वनाथ चुधरी, जगदिश झाडे, निकेश ढेंगे, खुशाल काकडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.