चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
भद्रावती शहर येथील सामाजिक कार्यकर्ता बंटी उर्फ अश्विन हेमके यांची वंजारी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश जिल्हा चंद्रपूर शाखा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आली.
वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवार यांचा आदेशान्वये समाजाचा हितार्थ कार्याचे महत्त्व समजून चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुमीत करपे यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी संघातील वरीष्ठ पदाधिकारी अनिल कोहाळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता धात्राक, शहर अध्यक्ष संदिप कानकाटे, अतुल हेमके, संदिप, शुभम बट्टे, बादल खांडरे, रामजी खांडरे, रोहित, धात्रक, ओम प्रकाश धात्रक आदि उपस्थित होते.