चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीसांनी कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. गांजाची छुप्या पद्धतीने वाहतूक करीत असतात, अवैध व्यवसाय अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून वाहतूक करणारे पोलीसांच्या रडावर आले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू छुप्या पध्दतीने विक्री होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असल्याचे पण सांगितले जात आहेत.

बल्लारपूर पोलिसांनी यांची गंभीर दखल घेत सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे गुन्हे शोध पथकासह बल्लारपूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असता मुखबिराकडून गोपनीय माहीत मिळाली की, संत तुकाराम हाॅल जवळपास बालाजी वार्ड बल्लारपूर येथील एका पांढऱ्या शुभ्र रंगाची चार चाकी महिंद्रा बुलेरोमध्ये अमली पदार्थ गांजा वाहतूक होत आहेत.
दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार क्षणातच घटनास्थळ गाठून सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार वर्णनात्मक वाहनाची तपासणी करून दोन ईसमास ताब्यात घेवुन पंचासमक्ष झडतीअंती अवैध अमली पदार्थ गांजा आढळून आला. सदर ईसमास ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले.
या प्रसंगी आरोपी शाहरुख शेरखान पठाण (वय २९), शहिद उर्फ फिरोज अहमद खान(वय ५१) दोन्ही रा. रविंद्र नगर वार्ड बल्लारपूर येथील असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेवुन गांजा, वाहनासह संपूर्ण ५ लाख ५५ हजार रुपयांपर्यंत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच बल्लारपूर पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनात पो.नि.श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात, सपोनि मदन दिवटे, सपोनि. निलीमा बाबर, परि.पो.उप.नि. सौरभ साळुखे, परि.पो.उप.नि. सुनिल थांडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. सत्यवान कोटनाके, पोहवा, सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा, संतोष दंडेवार, पोहवा. संतोष पंडित, पो.अं. प्रकाश मडावी, वशिष्ठ रंगारी, मिलींद आजम, खंडेराव माने, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, मपोअं, अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.


