चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन सराफा दुकानात एका ईसमाने सोन्याची वस्तु दाखवा म्हणून चोरी केल्याची नुकतीच चंद्रपूर शहर येथून माहीती पोलिस सूत्रानुसार प्राप्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सराफा दुकानदार फिर्यादी यांनी सदर ईसमाला अंगठीचा ट्रे दाखविला नंतर अंगठी हातात बघुन ईसम “नंतर येतो” असे म्हणुन दुकानातुन निघुन जातो, काही वेळा नंतर ट्रे मधील एका अंगठीचा बार कोड टॅग दिसुन आला नसल्याने बिना बारकोड असलेली सोन्याची अंगठी सोन्याचे दागिने चेक करणाऱ्या कसोटीवर घासुन चेक केली. सोन्याची नसल्याचे आढळून येताच सि.सी.टि.व्ही. फुटेज चेक केले असता, यातील ईसम हा सोन्याची अंगठी काढुन नकली सोन्याची अंगठी ठेवताना दिसत होता.
दरम्यान घटनास्थळावर ३.०४० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत ३५ हजारची सदर आरोपीने चोरून नेल्याने आढळून येतातच सराफा दुकानदार मुख्य मालकांनी सदर ईसमाविरुध्द तक्रार चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल केली त्याचाविरूध्द अप. क. १०७/२०२५ कलम ३०३,३१८(४) भारतीय न्यास संहिता अन्वये नोंद करण्यात आला.
असाच प्रकार दुसर्या सराफ ज्वेलर्स येथे सुध्दा घडला यातील फिर्यादीची ३.०१० ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत ३० हजार रुपये यातील आरोपीने चोरून नेली असल्याने सराफा व्यवसायीकाने पण तक्रार दाखल करून पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथील अप.क्र. १०८/२०२५ कलम ३०३, ३१८ (४) भारतीय न्यास संहिता अन्वये गुन्हा नोंद करून तपासाचे चक्र वेगाने फिरवीत ईसमास अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले.
नमुद गुन्हा उघडकीस आला पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके व गुन्हे शोध पथकानी अतीशय परिश्रम घेवुन अवघ्या २ तासात सराफा दुकानदाराची फसवणुक करणाऱ्या व त्यांना चकमा देउन सोनं चोरून पसार झालेला रेकार्डवरिल आरोपी नामे हम्झा अब्दुल वाहिद शेख (वय ३०, रा. अरविंद नगर वार्ड चंद्रपूर) यास काही तासातच अटक करून त्याचेकडुन १.अप.क.: १०७/२०२५ कलम ३०३,३१८(४) भारतीय न्यास संहिता या गुन्ह्यातील ३.०४० ग्रॅम किंमत ३५ हजार रूपये ची २) अप.क्र.:- व १०८/२०२५ कलम ३०३,३१८(४) भारतीय न्यास संहिता या गुन्हयातील ३.०१० ग्रॅम वजनाची किंमत ३० हजार रूपये तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी ॲक्टीवा क्र. एम. एच. ३४ झेड १५५८ किंमत ४५ हजार, मोबाईल ओपो कंपनीचा किंमत २० हजार, असा एकुण १ लाख ३० हजारचा माल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अधिक्षक पोलिस उपअधीक्षक प्रमोद चौगुले, पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, पोउपनि, संदिप बच्छीरे, पो. हवा. सचिन बोरकर, संतोष कनकम, म.पो. हवा. भावना रामटेके, नापोशि. कपुरचंद खरवार, पो.अं. इम्रान खान, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केलेली आहे.
चंद्रपूर शहर पोलिसांचे आवाहन
सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की,पोलिस स्टेशन दाखल गुन्ह्यामध्ये सराफ मालकाने दुकानात सीसीटीव्ही फुटेज लावावे तसेच फुटेजच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपीला पो.स्टे. चंद्रपुर पोलिसांनी काही तासातच पकडण्यात यश आले.
म्हणूनच जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी व सराफा दुकान व्यवसायीक मुख्य मालकांना आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपले रहात्या घरी, दुकानामध्ये व आजुबाजुच्या संवेदनशिल परीसरातील ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज बसविण्यात यावे असे नम्र विनंती पुर्व आवाहन केले आहे.