महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा अधिवेशन

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूरचे ग्रामीण प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, नगर परिषद, जिल्हा परिषद प्राथमिक, आदिवासी आश्रमशाळा इत्यादी विभागाचे संयुक्त चंद्रपूर जिल्हा अधिवेशन दिनांक १५ व १६ फेब्रुवारीला उद्धव सेलिब्रेशन हॉल बल्लारपूर रोड राजुरा येथे संपन्न होणार आहे.

केजी ते पीजी स्तरापर्यंत काम करणाऱ्या जी. प.न. प. खाजगी अनुदानित विना अनुदानित आश्रमशाळा, प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक व कॉन्व्हेंट, प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न हिरीरीने निकाली काढणाऱ्या या संघटनेच्या अधिवेशनात जुनी पेन्शन योजना, टीईटी,नवीन शैक्षणिक धोरण, आश्वासीत प्रगती योजना, ७ व्या वेतन आयोगातील त्रुटी ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध,विना अनुदानित शाळांना अनुदान, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तसेच शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे .

याप्रसंगी उद्घाटक म्हणून राजुरा  विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावजी भोंगळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष विलास खोंड हे कार्यक्रमाध्यक्ष तर स्वागताध्यक्ष विलास बोनगिरवार, माजी नगराध्यक्ष राजुरा नगर परिषद असणार आहेत.

माजी शिक्षक आमदार ,नागपूर नागो गाणार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत .

मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अधिवेशनस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन म. रा. शि. प.राजुराचे अध्यक्ष श्री .प्रभाकर साळवे , कार्यवाह श्री.दयानंद चिंतलवार ह्यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.