शेवणीचोर गावातील रेती तस्करीवर छापा

महसूल विभागाची कारवाई

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी व अवैधरित्या उपसा होत असल्याचा आरोप सात्यत्याने सुरू असल्याने महसूल विभाग यांनी पथक तयार केली. सदर पथक पेट्रोलिंग करीत असतांना इरई नदीच्या पात्रातील रेतीचा उपसा होत असल्याच्या माहितीनुसार छापा टाकून शेवणीचोर गावातील अवैधरित्या रेती उपसा चोरी करणाऱ्या ताब्यात घेवुन कठोर कारवाई करत ३  टॅक्टर जप्त केले.

टॅक्टर क्रमांक MH -34- A-37 56 कपिल रमेश आवळे, MH- 34 CD- 4763 अभय सपाट, MH- 34- BR 8915 कुवरलाल तोताराम केवट असे तीन टॅक्टर जप्त केले. गुप्त माहिती मिळाल्यावरून सदर वाहन तहसील कार्यालय चंद्रपुरचा ताब्यात घेतले.

ही कारवाई तहसीलदार विजय पवार यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, ग्राम महसूल अधिकारी दिनेश काकडे, विशाल कोसनकर, अनुप वघारे, आखरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.