चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था , मारडा ( लहान) च्या वतीने दिला जाणारा तेजस्विनी साहित्य पुरस्कार भद्रावती येथील कवी, लेखक अरुण घोरपडे यांच्या “चांगभलं” या अभंगसंग्रहाला नुकताच जाहीर झाला आहे.
अरुण घोरपडे हे पोलीस विभागात कार्यरत असून ते साहित्य क्षेत्रात परिचित आहे. घोरपडे यांचा चांगभलं या अभंगसंग्रहासोबतच “मानसातला मानूसपना” हा त्यांचा कवितासंग्रह सुद्धा 32 वे झालीबोली साहित्य संमेलन, वरोराच्या वतीने प्रकाशित झालेला आहे. अनेक कवी संमेलनात त्यांनी आपल्या कवितेने आणि अभंगाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
याप्रसंगी साहित्य पुरस्कार वितरण समारंभ येत्या 02 फेब्रुवारी 2025 रोजी पत्रकार भवन, चंद्रपूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असून यावेळी घोरपडे यांना तेजस्विनी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. घोरपडे यांना तेजस्विनी साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.