सावलीत रेती तस्करीवर छापा !

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक करणार्‍या व्हाईट काॅलरचा आतंक वाढला असतांना  त्यात रात्रंदिवस मेहनत करून अगडबंब हिरव्यागार नोटा कमवत असतात. गावातील लोकप्रतिनिधींचा विविध निधीतून रस्त्यावरील मोठ- मोठे हायव्हा ट्रक रेती वाहतूक करीत असल्याने खड्डेमय रस्ते करण्यात यांचा खुप मोठा वाटा आहेत.

तसेच रात्री थकून आलेले शेतकरी, शेतमजूर नागरीकांना अवजड वाहनांसह ट्रकचा आवाजाने झोप मोड करण्यात पण यांचा खूप मोलाचा वाटा असल्याने नागरिकांचा वारंवार तक्रारीवरून पोलिसांना गोपनीय माहिती देण्यात आली. २५ जानेवारीला सावली हद्दीत अवैध रित्या ट्रॅक्टरने रेती वाहतूक करीत असतांना  शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी छापा टाकून रेती भरलेले ट्रॅक्टरसह ट्राली ताब्यात घेत कारवाई करून करण्यात पोलिसांना यश आले.

कारवाई दरम्यान ३ ब्रांच रेती गौण खनिज, ३ ट्रॅक्टरसह ट्राली किंमत १२ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असल्यास आरोपींविरुद्ध अपराध क्र. १९ २०२५ कलम ३०३(२)२२३,३(५) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहीती पोलिस सूत्रानुसार प्राप्त झाली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचा मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार प्रकाश बलकी, सुभाष गोहेकर, पोलिस अंमलदार मिलिंद जांभुळे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.