चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून चंद्रपूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चोरीचा घटनांचा उघडकीस आणावेत या बाबतीत पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू , उपविभागीय पोलिस अधीकारी सुधाकर यादव यांनी रामनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आसिफ राजा शेख यांच्यासह गुन्हे शोध पथकातील मार्गदर्शन करुन सुचना केल्या. आसिफ रजा शेख यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी, अंमलदार यांना दुचाकी वाहन चोरटे यांची गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ गुन्हाची शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिलेत.
यानुसार रामनगर शोध पथकासह अंमलदार, अधिकारी सुद्धा रामनगर पोलिस स्टेशन येथील अपराध क्र. ११९८/ २०२४ कलम ३०३ (२) B.N.S. मधील चोरीच्या तपासाला कसोशीने सुरुवात केली असतांना गुप्तबातमीदारांनी सदर चोरीचा घटनेची गुप्त माहिती दिली.
दिलेल्या माहितीच्या आधारावर गुन्हातील आरोपीचा मागावर राहुन त्याचा ठाव ठिकाणा शोधाशोध केल्यानंतर आरोपी राहत असलेल्या ठिकाणावरून वारंवार पळून जात असे. आरोपीला शिताफीने सापळा रचुन शेवटी २१ जानेवारीला ताब्यात घेतले असता, त्याला विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने खाकी वर्दी दाखवताच त्याने अनेक खुलासे केले. रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत, चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्याची कबूली जबाब देऊन ४ लाख ८ हजार किंमतीचा ९ मोटर सायकल जप्त करून विविध भागातील दुचाकी चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
सदरील कारवाई ही पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांचा मार्गदर्शनात रामनगर पोलिस स्टेशन निरीक्षक आसिफ राजा शेख, API देवाजी नरोटे, API हनुमान उगले, आनंद खरात सचिन गुरुनुले, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनिषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पुलवार, ब्लुटि साखरे यांनी केली.