चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
कुमार व कुमारी गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विद्यार्थी युवक क्रिडा मंडळाचा उत्कृष्ट खेळाडू लुकेश श्रीकृष्ण काळे यांची विदर्भ राज्य संघात निवड झाली आहे.
उत्तराखंड येथील उत्तराखंड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वि कुमार- कुमारी राष्ट्रीय अंजिक्यपद नांदगाव पेट अमरावती स्पर्धेमध्ये जिल्हा हौसी कबड्डी असोसिएशन चा संघात उत्कृष्ट कामगिरी आपल्या खेळाची चमक दाखवुन उल्लेखनीय कामगिरी केली.
वर्षा भरातील जिद्द चिकाटि व जेष्ठ नामवंत राष्ट्रीय कबड्डी पटू सचिन बोरकर यांचा मार्गदर्शनात विद्यार्थी युवक क्रिडा मंडळाचा मैदानावर राष्ट्रीय खेळाडू श्रीकृष्ण काडे हा सराव करीत असतांना मंडळाचे सर्वेसर्व अध्यक्ष प्रा. विशाल शिंदे यांचा मोलाचा मार्गदर्शनात आई वडीलांचा आशिर्वाद असल्यास त्याला यश प्राप्त झाल्याचे लुकेश ने आपले मत व्यक्त केले.
निवड झाल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रा. विशाल शिंदे, प्रशिक्षक अजिस शेख, सचिन वावरदडपे, अमोल ठावरी मंळडाचे सर्व खेळाडू, पदाधिकारी, क्रिडा प्रेमी यांनी त्याचा अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.