Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष
    राजकारण

    अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 14, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी खोचक टोला लगावला आहे. ‘अशा प्रकारच्या चर्चा पवार कुटुंबाबाबत  नेहमीच होतात. पण पुढे जाऊन त्या प्रत्यक्षात येत नाहीत. आताही सारखी चर्चा चालली आहे. अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे. जयंत पाटील वगैरे हे सर्व जण असे लांब उभे असतात. काय तुम्ही निर्णय घेणार ते सांगा. हे तीन जण मिळून पक्ष होता. रोहित पवार वगैरे हे देखील सर्वजण लांबच आहेत. या तीन जणांच्या एकत्रीकरणाची अशी चर्चा खूप वेळा होते, पण गेल्या अडीच ते तीन वर्षांमध्ये ती काय अजून प्रत्यक्षात आलेली नाहीये,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येतायेत म्हणून दोन्ही पवारांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली आहे का? असा प्रश्नही यावेळी चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देणं त्यांनी टाळलं, माहीत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी देखील पवार यांची भेट घेतली आहे. दोन्ही पवार एकत्रीत येणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

     

     

    chandrakant patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    बंडाची तलवार म्यान?

    June 6, 2026

    सर्वसामान्यांचा वारकरी..!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif