चंद्रकांत पाटील यांच्या समोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

कोल्हापूर येथे मंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यांच्यासमोरच एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पण, वेळीच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी या तरुणाची विचारपूस न करताच निघून गेले. ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. परशुराम नामदेव कांबळे असं या तरुणाचं नाव आहे. त्याने जिल्हाधिकारी दालनासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न  केला.

जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याची मागणी करूनही न्याय मिळत नसल्याचे म्हणत, आम्ही सर्व पत्र व्यवहार केले, अधिकाऱ्यांनी आमच्याकडून पैसे घेतले आहे. पण अजूनही न्याय मिळाला नाही. सगळी कागदपत्र आहे माझ्याकडे, पण तरीही पालिकेकडून निर्णय घेतला जात नाही. नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनाही भेटलो होतो. मंत्रालयातही अनेक चकरा मारल्या. आमच्याकडे पैसे नाही, त्यामुळे मुंबईला जाऊ सुद्धा शकत नाही, अशी व्यथा या तरुणाने मांडली.

वेळीच तिथे हजर असलेल्या पोलिसांनी झडप घालून त्याला रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या परशुराम कांबळे याला पोलिसांनी घेतले ताब्यात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.