wired magazine 2015 gift guide timber lodge medina coupons super cool gifts for mom demi lovato song gift friend lyrics
Thursday, December 1, 2022

धक्कादायक ! ६० विद्यार्थीनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

चंडीगड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पंजाबच्या मोहालीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.  महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीनं आपल्या मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केले. हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर हॉस्टेलच्या ८ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

महाविद्यालयात गदारोळ माजला

दरम्यान महाविद्यालयात रात्री उशिरा गदारोळ माजला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. महाविद्यालयाच्या गेट नंबर २ वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शने करत कारवाईची मागणी केली. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांकडून योग्य त्या कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थीनी शांत झाल्या आहेत. तसेच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ८ विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे.

 ६० विद्यार्थींनीचे व्हिडिओ रेकॉर्ड 

चंडीगड युनिव्हर्सिटीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. मध्यरात्री जवळपास अडीच वाजता काही विद्यार्थीनी युनिव्हर्सिटीच्या गेटजवळ पोहोचल्या आणि जोरजोरदात घोषणाबाजी करू लागल्या. मुलींच्या वसतीगृहातील एका मुलीनं आपल्या सहकारी विद्यार्थींनीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. एक दोन नव्हे, तर तब्बल ६० विद्यार्थींनीचे व्हिडिओ तिनं रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ ती एका मुलाला पाठवत असे. संबंधित मुलगा हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करत होता. हे धक्कादायक प्रकरण युनिर्व्हसिटीच्या प्रशासनाला लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करत आहेत.

विद्यार्थीनींची जोरदार घोषणाबाजी

युनिव्हर्सिटीच्या गेटवर जाऊन रात्री उशीरा विद्यार्थीनींनी जोरदार निदर्शने केली. आरोपी विद्यार्थीनीची ओळख पटवण्यात आली आहे. तसंच हॉस्टेलमध्ये युनिव्हर्सिटी प्रशासनानं इतर विद्यार्थींसमोर याप्रकरणाबाबत तिला जाबही विचारला आहे. तिनं आपला गुन्हा कबूल करत खूप आधीपासूनच विद्यार्थीनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं तिनं मान्य केलं आहे. ती हे व्हिडिओ ज्या मुलाला पाठवत होती तो शिमला येथील रहिवासी असल्याचं तिनं सांगितलं आहे. अद्याप पोलिसांकडून याप्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद किंवा अटकेच्या कारवाईबाबत माहिती समोर आलेली नाही.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या