Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता : हवामान खाते
    हवामान

    ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता : हवामान खाते

    राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 1, 2026No Comments55 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

    विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता आहे. मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. संध्याकाळ दरम्यान 40 ते 50 किमी प्रति ताशी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    मध्य महाराष्ट्रात देखील सर्वत्र वादळी वाऱ्यांसह पाऊस, काही ठिकाणी 50 ते 60 किमी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात देखील काही जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तब्बल 8 हजार 145 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये धुळे आणि साक्री  तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान साक्री  तालुक्यात झाले असून तेथील 9 हजाराहून अधिक शेतकरी बाधित झाले आहे तर धुळे तालुक्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जिरायत क्षेत्रात मका आणि उन्हाळी बाजरीचे नुकसान झाले आहे. बागायती क्षेत्रात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून भाजीपाल्याचे देखील 321 हेक्टरवर नुकसान झाले आहे फळपिकांमध्ये पपई डाळिंब आणि आंब्याच्या मोहर गळून पडल्याने बागायतदार हवालदील झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा व लवकरात लवकर मदत मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

    गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात काल सायंकाळी आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाचे वतीने गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता काल सायंकाळी अचानक मोरगाव तालुक्यात काही भागात वादळी वारा व अवकाळी पाऊस आला. वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिका जमीनदोस्त झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!

    November 9, 2026

    इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र

    November 9, 2026

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif