छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

0

मुंबई ,लोकशाही न्युज नेटवर्क
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल येवला येथून परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात काल तपासणी केल्यानंतर अहवालातून स्पष्ट झाले आहे.

छगन भुजबळ हे काल नाशिकहून येवला येथे शहीद जवान अजित शेळके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. जवान शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते येवला येथील निवासस्थानी गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर ते येवल्याहून नाशिकमध्ये परतले. थंडी, ताप असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपासणी केली असता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेणार असल्याचे समजते आहे.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीर जवान अजित शेळके यांना नुकतेच देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी काल सकाळी वीर जवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर संध्याकाळी छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. लागलीच त्यांना नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या त्यांच्यावर भुजबळ फार्म येथील राहत्या घरीच उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.