चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अखेर टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी घोषणा झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भारताचा संघ जाहीर केला. CT25 पूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि आज जाहीर करण्यात आलेलाच संघ या मालिकेतून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली BCCI ने तगडा संघ जाहीर केला आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या संघात आहे खरा, परंतु त्याच्या तंदुरुस्तीच्या अहवालावरच त्याच्या खेळण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

Champions Trophy 2025 India squad announcement live १९९८ पासून सुरू झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांनी सर्वाधिक दोन वेळा जेतेपाद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाने २००६ व २००९ मध्ये जेतेपद पटकावले आणि सलग दोनवेळा ही स्पर्धा जिंकणारा तो एकमेव संघ आहे. भारताने २००२ आणि २०१३ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका (१९९८), न्यूझीलंड (२०००), वेस्ट इंडीज (२००४4) आणि पाकिस्तान (२०१७) यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. आता रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १२ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे.

rohit sharma captain of india for champions trophy 2025 ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर BCCI ने खेळाडूंसाठी १० कठोर नियम जाहीर केले आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातही बदल पाहायला मिळेल असे वाटले होते. रोहित शर्मासह सलामीला शुभमन गिलला संधी दिली गेली आहे. यशस्वी जैस्वालचा संघात समावेश केला आहे आणि त्याचे पदार्पण शक्य आहे. लोकेश राहुलचा फलंदाज म्हणून संघात समावेश केला गेला आहे आणि गरज पडल्यास तो यष्टिंमागे दिसू शकतो. ऋषभ पंत हा यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून संघात आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा: हर्षित राणा ( इंग्लंड मालिकेसाठी)

 

IND vs ENG वन डे मालिका (वेळ – दु. १.३० वाजता)

 

६ फेब्रुवारी – पहिला वनडे, नागपूर

९ फेब्रुवारी – दुसरा वनडे, कटक

१२ फेब्रुवारी – तिसरा वनडे, अहमदाबाद

 

ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक

 

२० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

२३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

२ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

उपांत्यपूर्व १ मध्ये भारत पात्र ठरला तर तो सामना दुबईत होईल.

जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर तो सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळवला जाईल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.