Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अपघात प्रकरणी एसटी चालकाला एक वर्ष कारावासाची शिक्षा
    गुन्हे वार्ता

    अपघात प्रकरणी एसटी चालकाला एक वर्ष कारावासाची शिक्षा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 11, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अपघात प्रकरणी एसटी चालकाला एक वर्ष कारावासाची शिक्षा

    चाळीसगाव:;- भरधाव वेगाने एसटी बस चालवून अपघात घडविल्याप्रकरणी मच्छिद्र मधुकर देवरे (रा. हिरापूर, ता. चाळीसगाव) यांना चाळीसगाव न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल, असा निर्णय न्यायालयाने दिला.

    करगाव येथे झालेल्या या दुर्दैवी अपघातात एक मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला.

    खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व साक्षीदारांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण साक्षींच्या आधारे आरोपीने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने एसटी बस चालवून अपघात घडवल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.

    या प्रकरणात न्यायदंडाधिकारी एस. डी. यादव यांनी आरोपीला दोषी ठरवत एक वर्ष तुरुंगवास आणि ६ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

    या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता रमेश माने यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता शशिकांत माने, मनोज विजय माने आणि चेतना पी. कलाल यांनी खटल्यात सहकार्य केले.

     

    #chalisgaon #crime St mahamandal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif