धक्कादायक..घरी बोलावून तरूणीवर अत्याचार

चाळीसगाव तालुक्यात घडली घटना 

0

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढतच आहे. १९ वर्षीय तरूणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह राहते. जुलै २०२४ मध्ये तरूणीला गावात राहणारी पूजा शेळके हिनी घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिला एका रूममध्ये ढकलून बाहेरून कडी लावून घेतली. यावेळी रूममध्ये आधीच येवून बसलेला तरुणाने तरूणीचा हात पकडून तिच्यावर अत्याचार केला.

तरूणीच्या आईवडीलांसमोर..

ही घटना कुणाला सांगितला तर भाऊ व आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी हा दारू पिऊन आल्यानंतर तरूणीचा हा पकडून ओढले. हा प्रकार तरूणीच्या आईवडीलांसमोर झाला. दरम्यान पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.