चाळीसगावात प्रौढाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगावमधील मेहुणबारे शहरात ४५ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून याप्रकरणी चौकशीला सुरू आहे. या खुनामुळे चाळीसगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव दगडू वामन गढरी (वय ४५, रा. मेहुणबारे ता. चाळीसगाव) आहे. मेहुणबारे गावातील गिरणा विद्यालयाजवळ दगडू गडरी यांचा अज्ञात व्यक्तीने गळ्यावर लोखंडी कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. सदर व्यक्तीच्या मानेवर वार करून मारेकरी पसार झाले आहेत. नेमकं खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समजू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.