चाळीसगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींवर महिला राज

110 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींच्या अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदाचे आरक्षण निश्चिती करण्यासाठी  तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोडत सभा 21 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात आली. निश्चित  केलेल्या सरपंच पदामधून अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला यांचे सरपंच पद थेट सोडतीने निश्‍चीत करण्याकरीता उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 वाजता सभा घेण्यात आली.

त्यानुसार सरपंच पदाच्या सन 2025-2030 या कालावधीसाठी आरक्षण सोडत निश्चिती करण्यात आले. तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 56 ग्रामपंचायतींच्या खूर्चीवर महिला राज राहणार आहे.

तालुक्यातील 110 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण याप्रमाणे असणार आहे.

 

अनुसुचीत जाती प्रवर्ग सरपंचपद

लोंजे(महिला), शिंदी, दरेगाव(महिला), माळशेवगे (महिला), वलठाण, अंधारी, बाणगाव, गणेशपूर (महिला), बोरखेडा खुर्द, टाकळी प्र.चा., जुनोने (महिला), वडाळे-वडाळी (महिला).

अनुसुचीत जमाती प्रवर्ग सरपंचपद

खेरडे (महिला), आडगाव, रोकडे, डोणदिगर(महिला), पोहरे, खेडी खुर्द(महिला), टाकळी प्र.दे., वाघळी, तळोंदे प्र.चा.(महिला).सांगवी, पातोंडा(महिला), वाघले(महिला), पिंंप्री खुर्द (महिला), भोरस बुद्रूक, रंाजणगाव (महिला), बोरखेडा बुद्रूक, तांबाळे बुद्रूक (महिला).

नागरीकांचा मागास (ओबीसी)प्रवर्ग सरपंचपद

दस्केबर्डी(महिला), तळेगाव, खडकी बुद्रूक(महिला), ओझर (महिला), पिलखोड (महिला), कृष्णानगर, जामदा, नांद्रे, न्हावे (महिला), जामडी प्र.ब., लोंढे( महिला), बिलाखेड (महिला), सायगाव, देवळी(महिला), खेडगाव, कोदगाव, बेलदारवाडी, पाटणा, पिंप्री बुद्रूक प्र.चा.(महिला), बोढरे, चिंचगव्हाण (महिला), टेकवाडे खुर्द,गोरखपूर(महिला), सुंदरनगर, मुंदखेडे खुर्द (महिला),पिंपरखेड (महिला).

सर्वसामान्य सरपंचपद

पिंपळवाड निकुंभ, हातले, शिरसगाव(महिला), शिदवाडी (महिला), दहिवद, चितेगाव, दसेगाव बुद्रक, कुंझर (महिला), चांभार्डी खुर्द (महिला), तरवाडे बुद्रूक (महिला), पिंप्री बुद्रूक प्र.दे.(महिला), अलवाडी(महिला), पिंपळवाड म्हाळसा, करजगाव (महिला), खडकीसीम, मेहूणबारे(महिला), बहाळ, उंबरखेड, हिंगोणेसीम, हिरापूर(महिला), खरजई (महिला), उपखेड, रहिपुरी(महिला),भामरे ब्रुद्रूक, रोहिणी (महिला), ब्राम्हणशेवगे, हातगाव, वाकडी (महिला), देशमुखवाडी, पळासरे, रामनगर(महिला), तमगव्हाण, मांदुर्णे, वाघडू (महिला), डामरूण, विसापूर, तामसवाडी (महिला), धामणगाव (महिला), भवाळी, मुंदखेडे बुद्रूक, सेवानगर(महिला), चांभार्डी बुद्रूक (महिला), कळमडू, भऊर, राजदेहरे, चिंचखेडे( महिला), वडगाव लांबे, ओढरे, तळोंदे प्र.दे.(महिला, पिंपळगाव(महिला, हिंगोणे खुर्द (महिला), तिरपोळे (महिला), वरखेडे बुद्रूक, घोडेगाव (महिला), आंबेहोळ (महिला).

तालुक्यातील 110 सरपंचांमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग पुरूष 27, सर्वसाधारण महिला 28 नागरीकांचा मागास प्रवर्ग ओबीसी पुरूष 13,नागरीकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला 13, अनुसुचीत जाती प्रवर्ग पुरूष 6,अनुसुचीत जाती प्रवर्ग महिला 6, अनुसुचीत जमाती पुरूष 8, अनुसुचीत जमाती महिला 9 या प्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण निघाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.